माझे आजोबा श्री. बाबुराव दत्तात्रय नवाळे त्यांच्या आजोबांपासून असणारा चांदीचे वाळे तयार करण्याचा व्यवसाय करत होते. श्री. महावीर नवाळे यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली तसेच श्री. नाभिराज नवाळे यांनी देखील त्यांचे शिक्षण पूर्ण करून व्यवसायास सुरुवात केली. श्री. शांतिनाथ नवाळे यांनी 1975 साली डीएमई पूर्ण करून दोन वर्ष नोकरी केली आणि पुढील काळाचा विचार करून त्यांनी आपल्या व्यवसाय वेगळ्या पद्धतीने चालवून नवीन वस्तू तयार करण्याचा त्यांनी पण घेतला. त्यांनी नोकरी सोडून चांदीचे ग्लास तयार करण्याचा कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला. मशीन बाबतची माहिती असल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय कासार गल्ली येथे राहत्या घरी 1980 मध्ये चालू केला. त्यांना आपल्या दोन्ही मोठ्या भावनांची मोलाची साथ मिळाली. ग्लास तयार करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा बरेच अपयश आले त्यांनी धीर न जाऊ देता काम चालू ठेवले आणि एक दिवस असा आला की या कामात यश आले. चांदीच्या ग्लासची मागणी वाढू लागली आणि जागा कमी पडू लागली त्यानंतर या तिन्ही भावांनी मिळून शिरोली एमआयडीसी येथे कारखाना 1983 मध्ये चालू केला. मालाच्या चांगल्या प्रतिसादामुळे बाकीचे वस्तू देखील आता तेथे तयार होऊ लागले होते. व्यापारांचा वाढता कल आणि मालाची मागणी वाढतच गेली आणि त्यावेळी नवाळे ब्रदर्स हे नाव कंपनीला देण्यात आले. पश्चिम महारा्ट्रातील हा पहिला चांदीचा कारखाना आहे. जो आजही अखंडपणे चालू आहे.
श्री. महावीर नवाळे आणि श्री. नाभीराज नवाळे यांनी व्यापार पाहिला तर श्री. शांतिनाथ नवाळे यांनी कारखाना उभारण्यात आपले योगदान दिले. 1989 मध्ये कोल्हापूर येथील वाय पी पवार नगर म्हणजेच आत्ताच्या ठिकाणी ही कंपनी चालू केली. नवाळेंच्या रक्तातच व्यवसाय भिनला असल्यामुळे साहजिकच पुढची पिढी देखील या व्यवसायात आली. श्री. राजेंद्र नवाळे यांनी 1997 मध्ये या व्यवसायात पदार्पण केले. त्यानंतर नवाळे इंडस्ट्रीज हे नाव उदयास आले जी आजही अगदी जोमात आणि थाटात उभी आहे. काळाची गरज ओळखून यांनी होलसेल चा व्यवसाय पूर्ण भारतभर जोमाने पसरवला आणि त्याला NSK 100 अशी एक व्यवसायाला वेगळी ओळख निर्माण करून दिली.
2004 मध्ये श्री. स्वप्नील नवाळे हे देखील याच व्यावसायात एक वेगळी उमेद घेऊन आले. त्यांनी 2005 मध्ये casting च्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय देखील चालू केला. दरम्यान श्री.अभिजीत नवाळे यांनी 1998 मध्येच या व्यावसायात सहभाग देण्यास सुरुवात केली. 2004 मध्ये आपले बी.कॉम शिक्षण पूर्ण करून 2005 मध्ये कारखाना मध्ये आपले लक्ष केंद्रित केले. 1998 ते 2004 व्यापार आणि 2005 पासून आता पर्यंत असा प्रवास आहे. शिक्षण बी कॉम पण वडिलांच्या सोबत राहून त्यांनी डाय तयार करण्याचे धडे शिकून घेतले. श्री. अभिजीत नवाळे यांनी हाच वारसा जपत नवाळे इंडस्ट्रीज ही आज देखील उत्तमरीत्या चालवत आहेत.